ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्या कदाचित मलाही नोटीस येईल ; रोहित पवार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

भाजप सक्तवसुली संचलनालयाचा (ED) वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. कदाचित उद्या मलाही ‘ईडी’ची नोटीस येऊ शकते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. ते मंगळवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भाजप असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भाजपला लक्ष्य केलं. ‘ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!