लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही निर्देशांकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीतून भारताची दोन क्रमाकांनी घसरण झाली आहे. यावरुनच रोहित पवारांनी केंद्र सरकारनर निशाणा साधला आहे. तसं, ट्विटही त्यांनी केलं … Read more