अक्कलकोट : ”डिझिटल इंडियाच्या दुनियेत “कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेसने ” अक्कलकोटच्या ग्राहकांना उत्तम व तत्पर देऊन विश्वास संपादन करेल याची खात्री आहे ” असे उदगार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी काढले.
अक्कलकोट लक्ष्मी मार्केट येथील “कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस ” चे भव्य उदघाट्न आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले व सो. जि. अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष अशपाक भाई बलोरगी उपस्थित होते.
प्रथम कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस चे चालक किरण सुरेश वेदपाठक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सत्कार केला.
या प्रसंगी नगरसेवक विकास मोरे, चंद्रकांत वेदपाठक, विठ्ठल वेदपाठक, सुरेश वेदपाठक, अनिल वेदपाठक, अभिजित सूर्यवंशी, अमर शिरसाठ, श्रीधर गुरव, प्रवीण घाटगे, राहूल वेदपाठक, सागर वेदपाठक, कलप्पा खेडगी सह स्कुल मेमरी ग्रुपचे, सोन्या मारुती युथ फाउंडेशनचे, व राम गल्ली मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.