---Advertisement---

काव्य जागर करून मसाप दक्षिण सोलापूर शाखेने जागवल्या गदिमांच्या स्मृती

On: December 15, 2020 7:53 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर  (प्रतिनिधी):- महाकवी ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने विविध क्षेत्रातील कलावंताच्या सहभागाने काव्य जागर करीत गदिमांच्या गीत आणि कवितांना उजाळा दिला. सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी विद्या नगर येथील महागांवकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्राचे महाकवी,लेखक, गीतकार ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती जपल्या जाव्यात म्हणून त्यांचे स्मारक व्हावे आणि नव्या पिढीला गदिमा माहित व्हावे यासाठी जगभरातील अनेक देशात तसेच भारतातील 5 राज्यात आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने काव्य जागर हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कवी, लेखक, साहित्यिक यांच्यावतीने गदिमांच्या कवितांचे वाचन आणि दोन कवितांचे वाचन झाल्यानंतर त्यामध्ये गदिमांचे एक गीत असा काव्यजागर कार्यक्रम झाला.

 

यामध्ये ज्येष्ठ कवी  सुनील शिनखेडे ,सागर आचलकर, प्रा.दीपक देशपांडे, सारिका अग्निहोत्री, शिरीष देखणे, शोभा बोल्ली, किशोर चंडक, हेमकिरण पत्की,अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, अभिराम सराफ, रेणुका महागांवकर, मारूती कटकधोंड,ऋुतीश्री वडकबाळकर,गोविंद काळे, वंदना कुलकर्णी या सर्व मान्यवरांनी कवितांचे वाचन करून सहभाग घेतला तर रेकॉर्ड कले्नटर जयंत राळेरासकर आणि मोहन सोनी या दोघांनी गदिमांच्या गीतांची ध्वनीफित दोन कवितांमध्ये सादर करून रसिकांची दाद मिळवली.

 

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांनी प्रस्तावना केली यामध्ये त्यांनी गदिमांच्या आठवणी तसेच त्यांच्या कविता आणि गीतांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे यांनी केले तर आभार महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूरचे जितेश कुलकर्णी यांनी मानले.

 

कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि प्रा.दीपक देशपांडे यांची होती तसेच पृथा हलसगीकर,अभय जोशी, यांची होती तर संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन अविनाश महागांवकर यांनी केली. या कार्यक्रमाला उद्योगपती दत्ता आण्णा सुरवसे, पद्माकर कुलकर्णी, सुहास पुजारी, अॅड.रत्ना अंत्रोळीकर शहा, इंद्रजीत पवार, राष्ट्रीय महामार्गचे संजय कदम, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, केंद्रीय माहिती अधिकारी अंकुश चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम दर्जेदार तर झालाच त्याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळून यशस्वी करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!