बिहार,दि.८ : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रामविलास पासवान
यांचे गुरुवारी निधन झाले.गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान काही वेळा पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिलेली आहे. त्यांच्या निधनाने बिहार राज्यात शोककळा पसरली आहे.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1947 रोजी खगरिया गावामध्ये बिहार राज्यामध्ये झाला होता.त्यांचा लोकजनशक्ती हा पक्ष होता.त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. भारतातील हिंदी भाषिक राजकारणी म्हणून ओळखले जात असत.
लोकजनशक्ती पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बीए आणि एलएलबी पर्यंत उच्चशिक्षित आहेत. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम 1969 साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले त्यांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे केंद्र सरकार कोणत्या का पक्षाचा असेना ते केंद्रात मंत्री असायचे.हा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. पहिल्यांदा त्यांनी 1989 साली व्ही.पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर एच.डी देवेगौडा सरकारमध्ये मंत्री झाले. पुन्हा गुजराल सरकारमध्येही ते रेल्वेमंत्री होते.आता मोदी सरकार मध्येही ते मंत्री आहेत.