अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट काँग्रेस कमिटीच्यावतीने येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे.
यात नव्याने जो कायदा शेतकरी वर्गासाठी व कामगार वर्गासाठी आणला आहे त्याला विरोध दर्शविण्यात येणार आहे.हे विधेयक शेतकरी व कामगार विरोधात आहे आणि शेतकरी वर्गासाठी व कामगार वर्गासाठी हानिकारक आहे. तो निर्णय जाणून बुजन सुडबुद्धीने घेतलेला आहे.हा निर्णय मागे घ्यावा म्हणुन शुक्रवार दि.२ रोजी सकाळी 11 ते सायं.5 या वेळेत जुना तहसील कार्यालय, शहाजी हायस्कूल जवळ, अक्कलकोट येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी पूर्व तयारीसाठी बैठक घेण्यात आली.या बैठकीत कार्यकर्त्यांना म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.तरी या दिवशी तालुक्यातील शेतकरी बंधु, कामगार बंधु, नागरिक व युवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले आहे.