---Advertisement---

कोरोनामुळे अजून एका अभिनेत्रीचं निधन

On: December 7, 2020 1:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है फेम’ दिव्य भटनागरचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. अलीकडेच तिला करोनाच्या विषाणूची लागण झाली होती. ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

 

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य आणि शिल्पा शिरोडकर यांनीही सोशल मीडियावर दिव्याला श्रद्धांजली वाहिली आहेत. देवोलिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, ‘जेव्हा कोणीच कुणासोबत नसायचं तेव्हा फक्त तूच होतीस. तू माझी हक्काची होतीस जिच्यावर मी ओरडू शकत होते, रागवू शकत होते माझ्या मनातलं बोलून दाखवू शकत होते. मला माहीत आहे की आयुष्य तुझ्यासाठी तितकसं सोप्पं नव्हतं. वेदना खूप असह्य होऊन जातात.

 

पण मला माहीत आहे की आज तू एका चांगल्या ठिकाणी असशील. तू सर्व दुःख, वेदना, खोटेपणा याच्यातून मुक्त होशील. मला तुझी खूप आठवण येईल. दिवु, तुलाही माहित होतं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. फार काळजी वाटते. मोठी जरी तू होतीस पण लहानही तूच होतीस. तुझ्या आत्म्यास शांती मिळो. तू जिथे असशील तिथे आनंदी रहा. तुझी खूप आठवण येईल.’

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!