---Advertisement---

कोरोनावरील रेमडेसिवर इंजेक्शन पुणे विभागात १३ औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, दि.२४ : कोरोना रुग्णावर देण्यात येणाऱ्या रेमडेसिवर इंजेक्शनबाबत शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.आता खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाजवी किंमतीमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे.

पुणे विभागात १३ औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन मिळू शकेल,असे शासनाने जाहीर केले आहे. इंजेक्शन केवळ २ हजार ३६० रुपयांना उपलब्ध असून राज्यात ५९ ठिकाणी हे उपलब्ध करून देण्यात आले आहे.हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीमध्ये उपलब्ध होते की नाही याबाबतही खातरजमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दक्ष राहून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!