---Advertisement---

कोरोना रुग्णावर अवाजवी दर आकारणाऱ्या हॉस्पिटलला दणका

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२७ : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना बाधित रुग्णावरील उपचार करताना अवाजवी दर आकारून नये,असे आदेश दिले असतानाही अनेक हॉस्पिटलमध्ये असा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य विभाग सतर्क झाले असून कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता तसेच परवानगी नसताना कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या नवी मुंबईतल्या दोन खासगी रुग्णालयांवर नवी मुंबई महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही हॉस्पिटलला प्रत्येकी एक लाख रुपयेचा दंड ठोठावण्यात आहे,अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी दिली आहे. यापुढच्या काळातही शासनाने जाहीर केलेल्या दर पत्रकानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!