ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार का? जयंत पाटलांनी दिल ‘हे’ उत्तर

सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत मोठा विजय मिळविला होता. आता त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. त्यांनी साताऱ्यात समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिलंय.

 

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणूक लढवत नाही. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहत असतात, यामुळे ग्रामपंचायती निवडणुकांत पक्षाचे राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणूक चालत असतात, असंही ते म्हणाले.

याशिवाय शिवसेनेला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत जयंत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले. तर काही ठिकाणी अपयश मिळाले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबून असते, असे सांगून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!