सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करणाऱ्या आचेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सच्या वतीने यंदाच्या हंगामात ऊस पूरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन २१०० रूपये जमा केल्याचे जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना गणेश माने देशमुख म्हणाले की,यावर्षी जयहिंदचा गळीत हंगाम ६ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसापोटी २१०० रू.प्रतिटन असलेली रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.२६ नोव्हेंबर पासून १४ जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसापोटी बिल अदा करण्यात येत आहे. प्रत्येक लाॅटमध्ये पाच दिवसांचे नियोजन आहे.दर पाच दिवसांनी एक लाॅट याप्रमाणे बिल अदा केले जात आहे.विशेष म्हणजे १५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीतील बिल अदा केले असल्याने जयहिंद शुगर्सला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान,जयहिंद परिवाराने कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जयहिंद शुगर्सला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन गणेश माने देशमुख यांनी केले आहे.
१ फेब्रुवारी नंतरच्या ऊसाला १०० रूपये अधिकचा दर
यंदाच्या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांचे फार मोठे सहकार्य लाभले आहे.याची जाणीव जयहिंद परिवाराला आहे.म्हणूनच १ फेब्रुवारीनंतर गाळपास येणाऱ्या ऊसाला २१०० रु. आणि वाढीव १०० असे एकूण २२०० रु. प्रतिटन दर देणार आहोत.विशेष म्हणजे १ फेब्रुवारीपासून ऊस आल्यानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे.