---Advertisement---

महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले ; आदित्य ठाकरे

On: February 3, 2021 11:20 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एफएचआरएआय चे उपाध्यक्ष गुरबक्सीश सिंह कोहली, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, एचआयएचे अध्यक्ष भाटिया, चटवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना ठाकरे यावेळी म्हणाले, कोविड महामारीच्या काळात हॉटेल व्यावसायिकांनी मोलाची कामगिरी केली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ हे सातत्याने संकटाला तोंड देत होते. अशा वेळी त्यांना सोयीसुविधा देऊन, ‘अतिथी देवो भव’ या निस्वार्थी भावनेने त्यांच्या निवासाची सोय करुन हॉटेल असोसिएशनने सहकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्र बंद असताना त्यांना चालना देण्यासंदर्भात शासन स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातून पर्यटन विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देऊन पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना देता येईल यावर एकमत झाले.

 

लॉकडाऊननंतर राज्याच्या मिशन बिगिन अगेन या संकल्पनेंतर्गत ही चांगली सुरुवात होत आहे. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा हॉटेल उद्योगासाठी लाभदायक ठरणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस च्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अधिक सुलभ रितीने मिळण्यासाठी ‘सिंगल स्टॉप’ तसेच ‘डेस्क’ या संकल्पना सुरु करण्याचा विचार शासन करीत असून परवाने प्राप्तीसाठी ही संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!