---Advertisement---

जुळे सोलापूरमध्ये महिलेच्या हत्त्येने खळबळ

On: December 14, 2020 10:15 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : जुळे सोलापूरमधील नीता रेसिडेन्सीमध्ये एका महिलेचा डोक्‍यात कोणत्या तरी हत्याराने मारून खून करण्यात आल्याची आज सकाळी घडलीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. अर्चना विकास हरवाळकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी मृत महिलेच्या पतीलाच संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

ही घटना उघडकीस येताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. मृत महिलेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!