---Advertisement---

टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

On: February 6, 2021 3:10 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल. पुढील सुनावणीच्या वेळी राज ठाकरे यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही.

26 जानेवारी 2014 रोजी वाशी टोल नाक्यावर स्फोटक भाषणबाजी केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना आज वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती. या तोडफोड व भाषण प्रकरणी राज ठाकरे आज वाशी न्यायालयात हजर झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!