---Advertisement---

तरुणांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष महिबुब शेख यांचे आवाहन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.१२ : राज्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण युवकांनी पक्षासाठी काम करत असतानाच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कार्यरत रहावे असे आवाहन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख यांनी केले.

महिबुब शेख हे सोलापूर दौऱ्यावर आले असतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर सरचिटणीस सुयश महेश गायकवाड यांनी त्यांची भेट घेवुन त्यांचा सत्कार केला, यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शहर अध्यक्ष जुबेर भाई बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रदेश अध्यक्ष महिबूब शेख म्हणाले की,जेष्ठ नेते शरद पवार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्य करत रहावे, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे महिबुबभाई यांचा सत्कार युवक शहराध्यक्ष जुबेरभाई बागवान, युवक सरचिटणीस सुयश गायकवाड व सर्व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!