ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

दुधनी : अक्कलकोट  तालुक्यातील दुधनी येथील नगरपरिषद, गांधी चौक, म्हेत्रे प्रशाला, परमशेट्टी हायस्कुल, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद शाळांमध्ये ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दुधनी येथील नगर परिषदेत नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे यांच्या हस्ते तर शहरातील गांधी चौकात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गुरुशांत ढंगे यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र ध्वजाला मानवंदना देण्यात आले. त्या नंतर परमशेट्टी शाळेचे शिक्षक कलबुर्गी यांनी माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत हरित शपथ दिली. तेव्हा उपस्थित नगरसेवक, नागरीक, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्त्यांनी शपथ केली. यावेळी मुख्यधिकारी आतिश वाळुंज, कार्यालयीन अधिक्षक चिदानंद कोळी, उपनगरध्यक्ष विजयकुमार मानकर, महेश पाटील, शिवानंद माड्याळ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

म्हेत्रे प्रशाला आणि श्री गुरुशांतलिंगेश्वर महविद्यालय दुधनी.
म्हेत्रे प्रशाला आणि श्री गुरुशांतलिंगेश्वर महविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होते. प्रारंभी माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन तर प्रशालेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्तेध्वजा रोहण करण्यात आले. यावेळी दहावी आणि बारावी परिक्षेत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदक प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. ल.सा. म्हेत्रे प्रशालेच्या माजी विद्यार्थी अकबर सौदागर यांनी कठीण परिस्थितीवर मात करुन पोलिस दलात सामील झाल्या बद्द्ल प्रशालेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे यांनी विशेष सत्कार केले.

एस.जी परमशेट्टी हायस्कुल दुधनी.
येथील श्री संगण्णप्पा गोविंदप्पा परमशेट्टी हायस्कुल येथे ७२वा प्रजासत्तक दिना निमित्त शाळेचे मुख्याध्यापक बबन सैंदाणे यांच्या ह्स्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक आर.जी आलिगवे, डि.एच. हिळ्ळी, एन.व्ही कलबुर्गी, पी.एस. कोळी, आर.बी पाटील सिद्धारम नुला आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी
अक्कलकोट रोडवरील श्री शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यवेळी माजीसभापती शंकर म्हेत्रे, आडत-भुसार व्यापारी असोशियेशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, गुरुशांत ढंगे, सचिव एस.एस.स्वामी, लेखपाल एम.सी कोंपा आणि आडत भुसार-व्यापारी, बाजार समितीतिल सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!