---Advertisement---

अक्कलकोट येथे मातोश्री कन्स्ट्रक्शनचा शुभारंभ

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोट येथील युवा इंजिनिअर पुष्पक जाधव यांच्या मातोश्री कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात चांगली घरे निर्माण होतील,असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केला.चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी माझा आशिर्वाद सदैव पाठशी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

अक्कलकोट येथे पुष्पक जाधव यांच्या नवीन मातोश्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
समाजातील गरजू आणि विविध धर्माच्या धार्मिक स्थळांचे बांधकाम कमीत कमी खर्चात विना मोबदला करून देणाऱ्या
युवा इंजिनिअर पुष्पक जाधव यांचे कार्य कौतुकास्पद आहे,असे मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.तर बांधकाम क्षेत्रातून पुष्पक जाधव यांनी या परिसरात ख्याती मिळवावी,असे प्रतिपादन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.यावेळी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे,शहराध्यक्ष मनोज निकम,प्रा. प्रकाश सुरवसे, माणिक बिराजदार, इस्माईल फुलारी,शंकर व्हनमाने,बाळा शिंदे, पूनम राठी, इंजिनिअर पुजा जाधव, डॉ.लिंगराज बोकडे, सुभाष पुजारी ,प्रथमेश चव्हाण, शहाजी माने, प्रकाश पडवळकर, भीमराव साठे, शिवराज स्वामी, सुरेखा पाटील,रेणुका जाधव, इरफान आतारी, गणेश कांबळे, इंजिनिअर रोहित मुळे, कृष्णा घाटगे,सागर जाधव उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम जाधव यांनी केले.अतुल जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पुष्पक जाधव यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!