---Advertisement---

…म्हणून राज ठाकरेंविरोधात बेलापूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला

On: January 28, 2021 6:17 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वाशी टोलनाक्‍यावर झालेल्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

वाशीमध्ये 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

 

अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने आता वॉरंट जारी केले आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!