---Advertisement---

दुधनीत वीर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२वी जयंती साजरी

Follow Us:
---Advertisement---

दुधनी दि. २५ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील पंचमसाली युवा संघटनेच्यावतीने विर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुरुवात विर राणी कित्तुर चन्नम्मा यांच्या प्रतिमा पुजनकरुन करण्यात आले. राणी चन्नम्मा यांचे प्रतिमा पुजन प्रसिद्ध औषध विक्रेते लक्ष्मीपुत्र परमशेट्टी आणि प्रसिद्ध आडत व्यापारी गुरुशांतप्पा परमशेट्टी यांच्या ह्स्ते करण्यात आले.
यावेळी सुभाष परमशेट्टी, भागेश यरगल, अप्पु परमशेट्टी, चंद्रकात भत्ता, सातलिंग परमशेट्टी,चिदानंद परमशेट्टी, शशिकांत सावळसुर, रमेश ढंगे, राजू खंडाळ, सिद्धाराम खंडाळ व पंचमसाली युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा संघट्नेचे अध्यक्ष गुरुशांत हावशेट्टी यांनी केले तर शशिकांत सावळसुर
यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!