---Advertisement---

पंढरपूरमध्ये २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

On: February 8, 2021 11:12 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर: पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी भाजपचे माजी उपजिल्हाप्रमुख शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे ,संदीप केंदळे ,सुधीर अभंगराव ,लंकेश बुरांडे सह 25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन केली. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

यानंतर शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार राज्यभर चांगलाच गाजला होता. या प्रकरणी शिरीष कटेकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. . भा.द.वि कलम 324,323 ,143,147,149 ,500 प्रमाणे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!