---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले विश्वसनीय विश्वलिडर – रामदास आठवले

On: January 4, 2021 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्व  नेत्यांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय क्रमांक एकचे नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी ट्विटर द्वारे केले आहे.

सर्व भारतीय जनतेचा अतूट विश्वास जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी  जगभरातील लोकशाही प्रेमींचा विश्वास जिंकला असून ते विश्वसनीय विश्वलिडर बनले आहेत. त्यांच्या दृष्ट्या महान  नेतृत्वाचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देताना म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!