---Advertisement---

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी अक्कलकोटमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम ; राष्ट्रवादीने आयोजित केला उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१० : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे शनिवारी ( दि.१२) डिसेंबर रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी दिली.

हा कार्यक्रम फत्तेसिंह चौक येथील सर्जेराव जाधव सभागृहात सकाळी १० वाजून १० मिनिटांनी चालू होणार आहे.या कार्यक्रमात पवार यांच्या ५५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या उपक्रमातून महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी पवार यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले भरीव योगदान महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गासमोर ठेवणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रातील ३५० तालुक्यात एकाच वेळी लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.हा कार्यक्रम अक्कलकोटमध्ये देखील लाईव्ह आयोजित करण्यात आला आहे.उपस्थितांना स्वतः पवार हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास शहरातील डॉक्टर,व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक,महिला, प्रतिष्ठित व्यक्ती आदींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन अक्कलकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश सुरवसे, ओ. बी. सी. सेलचे नेते शंकर व्हनमाने, पदवीधर तालुकाध्यक्ष राजरतन बाणेगाव, महादेव वाले, राहुल किरनळ्ळी, राम जाधव, इस्माईल फुलारी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!