---Advertisement---

पसंतीच्या क्रमांकासाठी डीडी पाठवा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.24 : जिल्ह्यात चारचाकी वाहनाकरिताची MH-13-DP ही  नवीन क्रमांक मालिका सुरू होणार असून पसंतीच्या आणि आकर्षक क्रमांकासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा मागणी धनाकर्ष (डीडी) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे.

ग्राहकांनी डेप्युटी आरटीओ, सोलापूर यांच्या नावे डीडी काढून परिहन कार्यालयातील लिपीक एस.एच. हरवाळकर यांच्याकडे 28 सप्टेंबर 2020 च्या दुपारी तीन वाजेपर्यंत जमा करावेत. एकाच आकर्षक क्रमांकासाठी जास्त मागणी अर्ज आले तर  त्याचा लिलाव करून क्रमांक देण्यात येणार असल्याचे श्री. डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!