ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

सातारा : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. सर्व संबंधित यंत्रणांनी पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव  संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपुत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

 

 

 

प्रारंभी जलसंपदा विभागाचे सचिव श्री.घाणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी कोयना धरणाची संपूर्ण माहिती दिली. कोयना धरण पाहणीनंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!