पुणे | तब्बल ८ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुण्यातील शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शनिवार वाडा खुला करण्याचा पुरातत्व विभागाने निर्णय घेतला आहे. शहरातील इतर स्थळेही खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आम्ही सर्व काळजी घेत असून ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत सध्या कमी लोक भेटीला येत आहेत, अशी माहिती वाड्याचे इनचार्ज यांनी दिलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये पर्यटनस्थळेदेखील पुर्णत: बंद होती. त्यानंतर अनलॉक अंतर्गत राज्यात सर्व व्यवहार हळुहळु सुरळीत करण्यात येत आहेत. अनलॉक अंतर्गत राज्य सरकारने जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शाळा उघडण्यास परवानगी दिली.