पूरग्रस्तांना मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची,वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा अक्कलकोट दौरा
अक्कलकोट, दि.२० : राज्यात अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले ही खरी गोष्ट आहे,परंतु पूरग्रस्तांना मदत करणे ही पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यानंतर केंद्र सरकारची आहे,असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी, अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते. यात आंबेडकर यांनी सर्व प्रकारची माहिती लोकांपर्यंत जाऊन घेतली आहे.त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरती लोकांनी प्रश्न उपस्थित करुन आमचे मूळ प्रश्न न ऐकताच मुख्यमंत्री निघून गेले अशी भावना एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर व्यक्त केली. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी भावना त्यांनी केली.पुराची अशीच परिस्थिती असेल तर पुनर्वसनासाठी आपण पाठपुरावा करू,असे आश्वासन आंबेडकर यांनी दिले.मदत करताना पहिली जबाबदारी राज्याची असून हा अहवाल त्यांनी केंद्राला पाठवायचा नंतर ते करतील.पण पहिल्यांदा या सरकारचे काम आहे.याविषयी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहे,असे सांगितले.यावेळी सांगवी गावातील महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या,आपणच आमचे माय बाप आहोत,आम्हाला न्याय द्या अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी
प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष नाना कदम,जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे,शीलामनी बनसोडे,संदीप मडिखांबे, ज्योतिर्लिंग स्वामी देवानंद अस्वले,राहुल मोरे,आनंद मोरे, सुभाष ओहाळ, तुकाराम पारसे,रवी पोटे,बबन गायकवाड गौतम गायकवाड,नितीन शिवशरण,शाम बनसोडे,गुंडप्पा अरेनकेरी,संदीप गजधाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.