---Advertisement---

पेट्रोल-डीझेल महागले ; जाणून घ्या आजचा दर

On: January 13, 2021 10:01 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९१ रुपयांवर गेला आहे. गेल्या १० महिन्यात पेट्रोल दरात १४ रुपयांची वाढ झाली आहे. याच कालावधीत डिझेल १२ रुपयांनी महागले आहे. संथ गतीने होत असलेली इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२९ डॉलरने वधारला आणि ५३.५० डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.९२ डॉलरने वधारला असून तो प्रती बॅरल ५६.५८ डॉलर झाला आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात अवमूल्यन सुरु आहे. ज्यामुळे तेल आयातीचा खर्च वाढला आहे.

आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.०७ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.३४ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.६३ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.१८ रुपये असून डिझेल ७९.९५ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये असून डिझेल ७८.२२ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.३४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.९८ रुपये आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!