---Advertisement---

पेन्सिल स्केचद्वारे आ.भारत भालके यांना श्रद्धांजली

On: December 2, 2020 6:33 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर :  मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले यानंतर मतदारसंघात शोककळा पसरली भालके हे लोकांतील नेते होते त्यांचा प्रचंड जण संपर्क होता त्यामुळे अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध असायचे मंगळवेढ्यातील कु तृप्ती दत्तात्रय गुंगे ही बारावी कॉमर्स ला शिकणारी मुलगी रंगीत पेन्सिलने स्केच रेखाटते तिने या अगोदर आ भारत भालके यांचे स्केच काढले होते हे स्केच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर याची दखल आ भालके यांनी घेतली होती तिच्या घरी भेट देत तिचे मोठे कौतुक केले होते मात्र आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने दुःख झाल्यानंतर तिने पंढरीच्या पांडुरंगाचे आ भारत भालके हे अवतारी पुरुष म्हणून दाखवणारे स्केच काढले असून या कोरोना च्या या आजारात साक्षात देवाला देखील मास्क वापरण्याची आवश्यकता भासत असल्याचे तिने या चित्रातून रेखाटले आहे

महामारी ने मतदारसंघातील अनेक चांगल्या लोकांना आपला जीव गमवावा लागला असून तीन टर्म आमदारकी करत असतांना आपल्या प्रकृतीची हेळसांड केल्याने त्यांच्या जीवावर बेतले असल्याचे अनेकांनी आपल्या भावनेतून व्यक्त केले

हे स्केच देखील सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेले असून अनेकांनी व्हाट्सअप वर फेसबुक वर आपला डीपी स्टेटस तसेच अनेकांना फॉरवर्ड केले जात आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!