ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस भरतीबाबत राज्य सरकारकडून ‘जीआर’ जारी ; SEBC आरक्षण वगळून होणार भरती

मुंबई : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने जीआर जारी केला आहे. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे.

यामुळे SEBC तुन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गाच्याच अटी व नियम लागू होतील. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. १५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. यासोबतच विद्यार्थ्यांना खुल्या वर्गाचीच वयोमर्यादा लागू होणार आहे. यामुळे अनेक मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फटका बसणार असून समाजातील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात होती. यानंतर ही भरती मराठा समाजाच्या SEBC आरक्षणामुळे रखडली होती. दरम्यान, २५जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.   त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!