---Advertisement---

फडणवीसांचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही ; संजय राऊत

On: November 19, 2020 2:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कोणाच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा कोणी खाली उतरवू शकत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

‘भाजपला मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. शिवसेना ते होऊ देत नाही हे त्यांचं दु:ख आहे.  भाजपची कार्यकर्ती असलेली एक नटी मुंबई पोलिसांना माफिया म्हणत होती. मुंबईच्या जनतेविषयी उलटसुलट बोलत होती. मुंबईला पाकिस्तान बोलत होती. तेव्हा हे शुद्ध भगवावाले तिला पाठिंबा देत होते. अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका टीव्ही मालकाला हे पाठिंबा देतात. हे तुमचं मराठीपण आहे का? तुमचा हा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही,’ असं ते म्हणाले.

“भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे, असा ही टोला त्यांनी भाजपवर लगावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!