ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे, पण… ; बजेटवर संजय राऊतांची तीव्र नाराजी

नवी दिल्ली – 2021-22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (सोमवारी) आज संसदेत सादर केला आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे पण आम्हाला निराशा करणारा आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई पत्रकारांशी बोलत होते.

‘या अर्थसंकल्पाने नाराजी केली आहे. राज्याच्या वाट्याला काहीही आलेले नाही. जे आकडे येत असतात, ते किती खरे हे 6 महिन्यांनी समजते. पण मोदी सरकारने आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात, असा टोला राऊत यांनी लगावला. ‘नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

तत्पूर्वी, केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच  सर्व सामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे.’  अशी अपेक्षा संजय राऊत यांनी  व्यक्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!