---Advertisement---

बाळासाहेब सानपांची घरवापसी ; भविष्यात आणखी नेत्यांचा प्रवेश; फडणवीसांचा गौप्यस्फोट

On: December 21, 2020 2:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजपतून आधी राष्ट्रवादीत आणि लगेचच शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.  सानप यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आणखी काही नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘भाजपमध्ये येत्या काळात अनेक जणांचा प्रवेश होणार. काही जण रोज वावड्या उठवतात भाजपचे लोक आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचे कारण एकमेव आहे. कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. पण त्यांच्या पक्षात इतकी अस्वस्थता आणि नाराजी आहे. की हे आमदार काय करतील ही भीती असल्यामुळं या वावड्या उठवल्या जात आहेत,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, ‘भविष्यात भाजपमध्ये चांगले लोक येणार आहेत. त्यांना आपण सोबत घेऊन योग्य जबाबदारी देणार आहोत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘गेल्या काही काळाच विविध पक्षांतून भाजपमध्ये आलेले लोक राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलं आहे. या देशाचं भविष्य आणि वर्तमान नरेंद्र मोदी हेच आहेत. याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळं धोक्यानं आलेल्या सरकारचं भविष्य कितीकाळ चालणार याबाबतची माहिती सगळ्यांना आहे,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!