---Advertisement---

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

On: September 25, 2020 10:41 PM
Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२५ : बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे.त्यासाठी 28 ऑक्टोबरला 71 जागांसाठी आणि 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत.याची मतमोजणी मात्र 10 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज झालेल्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरक्षित मतदानासाठी काही खास उपाययोजना केल्या असून मतदानाची वेळही एक तासाने वाढवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!