ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू,अक्कलकोट येथे आमदार लाड यांचा सत्कार

 

अक्कलकोट, दि.७ : आमदार झाल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आपण एक दिशादर्शक कार्यक्रम निश्चित राबवू, असे प्रतिपादन पुणे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केले.

रविवारी,अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानण्यासाठी
ते अक्कलकोट येथे आले होते. त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. अक्कलकोट हा भाग सीमावर्ती आहे या तालुक्याचा विकास करण्यासाठी
आपण निश्चित पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करू.या ठिकाणची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेऊन बेरोजगार युवकांना दिशा देण्यासाठी आपण एखादा कार्यक्रम हाती घेऊ, असेही लाड यावेळी म्हणाले. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने यांनी केले. जिल्हा सरचिटणीस प्रकाश सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दहिटणे येथील
श्री स्वामी समर्थ साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा, त्याला आमची भक्कम साथ असेल, हा प्रश्न तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगितले. शहराध्यक्ष मनोज निकम यांनी पक्षवाढीसाठी शाखा उद्घाटन करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासंदर्भात लवकरच आपण ठोस पाऊल उचलू, असे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, पदवीधर तालुका अध्यक्ष रतन बानेगाव
यांनी आपल्या मनोगतात तालुक्याच्या विकासासंदर्भात भूमिका मांडली. लाड
यांनी अक्कलकोट दौऱ्यात श्री स्वामी समर्थ समाधी मठ, वटवृक्ष देवस्थान, अन्नछत्र मंडळ याठिकाणी कार्यकर्त्यांसोबत भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी महादेव वाले, शिवराज स्वामी, मोतीराम चव्हाण, शीतल फुटाणे, सलीम यळसंगी, माया जाधव, स्वामीनाथ पोतदार, बंदेनवाज कोरबु, आकाश शिंदे, सिद्धाराम जाधव, शंकर पाटील, गोटू माने, चंद्रकांत कुंभार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!