---Advertisement---

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे आमदार अरुण लाड यांच्याकडून कौतुक

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.७ : (प्रतिनिधी) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ व्यवस्थापनमुळे अन्नछत्र मंडळ गरुड भरारी घेत असल्याचे मनोगत पुणे पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले की, श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरु असलेली घोडदौड राज्यातील अन्य कुटल्याही देवस्थानात पाहायला मिळत नांही. या मंडळाचा महिमा संपूर्ण जगभरात पोहोचली आहे. मंडळाचे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यातही महत्वाचे योगदान असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावजी अभय देशपांडे, बेळगावचे निवृत्त न्यायाधीश वामनराव कनथरकर, नगरचे चारुलता कस्तुरे यांनी देखील मंडळास भेट दिली. याप्रसंगी न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज निकम, शिवराज स्वामी व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, आप्पा हंचाटे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, महांतेश स्वामी, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, विजय तथा गोटू माने, चंद्रकांत कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!