---Advertisement---

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत तावडे ,मुंडे यांची वर्णी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई,दि.२७ : भारतीय जनता पक्षाच्या काल जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काल ही यादी जाहीर केली.त्यामध्ये बारा राष्ट्रीय उपाध्यक्ष, आठ महासचिव आणि तीन राष्ट्रीय महासचिव यांची निवड केली आहे तर राजेश अग्रवाल यांच्याकडे पक्षाचे खजिनदार पद देण्यात आले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भाजप हा पक्ष नसून तो एक विचार आहे, असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून म्हटले
आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!