अक्कलकोट,दि.१३: मनुष्य जेव्हा डॉक्टरी इलाजाच्या शेवटच्या टप्यात येतो तेव्हा देवाचाच धावा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.या संस्कृतीला छेद देण्याचे
काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत,असा
आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.
राज्यात राज्यात सर्वत्र भाजपच्या वतीने मंदीरे
उघडण्यात यावीत,या मागणीसाठी आंदोलन
सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे मंगळवारी स्वामी समर्थ मंदिराजवळ भजन -कीर्तन आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्यापही उघडी नाहीत. त्यामुळे भाविकांना देवाच्या दर्शनापासून वंचित राहावे
लागत आहे. याउलट सुरुवातीस कोरोनामुळे केलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना वाईन शॉप आणि वाईन बार उघडण्यात आले. पण नवरात्रोत्सव शनिवारी सुरू होणार आहे. त्यामुळे आतातरी सरकारने मंदिरे उघडावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.दक्षिण महाद्वाराच्यासमोर भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. मंदिर बंद उघडले बार, उद्भवा धुंद तुझे सरकार !, असे घोषणा देत आंदोलकांनी भजने गायीली.यावेळी आंदोलकानीं भावना व्यक्त केल्या. सध्या जे बंद ठेवायला पाहिजे होते ते वाईन शॉप आणि बारमध्ये गर्दी होत नाही का? दुकानांसमोर रांगा लागतात. पण तेथे सोशल डिस्टंसिंग पाळून ती दुकाने सुरू केलीच ना? मग तशीच व्यवस्था सुद्धा मंदिर सुरू करताना केली जाऊ शकते याचा विचार करावा, आज आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शांततेच्या मार्गाने मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहोत. ही मागणी जर पूर्ण झाली नाही, तर उद्या आम्ही रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलने करू आणि त्यावेळी जर नको ते घडले तर त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार राहतील असे सर्वांचे सूर होते.
यावेळी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, आणप्पा बाराचारे, पंचायत समिती सदस्य राजु बंदिछोडे, गुंडप्पा पोमाजी, खय्युम पिरजादे, मिलन कल्याणशेट्टी, चंद्रकांत इंगळे, महेश हिंडोळे, शिवु वाले, प्रभाकर मजगे, प्रवीण शाह, आनंद खजुरगीकर, परमेश्वर यादवाड, सुरेखा होळीकट्टी, जयशेखर पाटील, मलकण्णा कोगणुर, रमेश कापसे,लखन झंपले, बसवंत कलशेट्टी, यशवंत धोंगडे,अविनाश मडीखांबे,राहुल रुही, धनंजय गाढवे, सुनिल गवंडी, प्रदिप पाटील, बंटी राठोड, अंबणणा चौगुले, नागू कुंभार, शबाब आलम कोरबु, आनंद पवार, कांतू धनशेट्टी, विक्रम शिंदे, रेवणा पाटील सर, अविनाश मडिखांबे, शिवशंकर स्वामी, दिपक जरीपटके, प्रकाश पाटील, नुरदीन बागवान, रमेश उप्पीन, रमेश रोडगे, मल्लीनाथ ढब्बे, उदय नरेगल यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.