---Advertisement---

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर

On: November 27, 2020 3:25 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.

निवडणुकीचे मतदान येत्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून  निर्देश प्राप्त झाले आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबईकडील शासन निर्णय क्रमांक – विनेर,2011/प्र.क्र.146/का-29 दिनांक 23 जून 2011 अन्वये अनुज्ञेय असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!