ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मतमोजणीला उरले अवघे काही तास ; अक्कलकोट तालुक्यात सहा टप्प्यात होणार मतमोजणी

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने देखील मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून ती एकूण सहा टप्प्यात पार पाडली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.
यावर्षी सर्वच ग्रामपंचायतीची मतमोजणी एकावेळी होणार नाही त्यांना ठराविक वेळ देण्यात आली आहे त्या ठराविक वेळेमध्ये त्या त्या ग्रामपंचायतीचे मतमोजणी होईल यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.सोमवार दि.१८ रोजी सकाळी ८-३० ते ११ पर्यंत सहा टप्प्यात याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन तहसिल कार्यालय अक्कलकोट येथे ही मतमोजणी होणार आहे.त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तालुक्यात लागेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या त्यामध्ये ९ बिनविरोध तर एक गावात फेरनिवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ८- ३० वाजता – गुड्डेवाडी, नागूर, तोरणी, गोगांव, मोट्याळ, शेगाव, साफळे, बर्‍हाणपूर, बोरोटी खु, निमगांव, आंदेवाडी खु, संगोगी (अ), सिंदखेड, बॅगेहळ्ळी, गळोरगी तर
सकाळी ९ वाजता देविकवठे, इब्राहिमपूर, डोंबरजवळगे, बोरोटी बु, बासलेगाव, चिंचोळी न. बादोले बु, हालहळ्ळी (अ), कर्जाळ, हिळ्ळी, भोसगे, खैराट, चपळगाव तर सकाळी ९ -३० वाजता – आळगे, बबलाद, भुरिकवठे, चपळगाववाडी तर सकाळी १० वाजता – गौडगांव खु, काझीकणबस, दोड्याळ, कल्लहिप्परगे, मुंढेवाडी, गुरववाडी, जेऊर, मराठवाडी, किणीवाडी, कोर्सेगाव, सिन्नूर, सांगवी खु, चिक्केहळ्ळी, पितापूर, किरनळ्ळी तर १०.३०वाजता – मिरजगी, चुंगी, गौडगांव बु, तडवळ, हैद्रा, नागणसूर, किणी, सुलेरजवहगे, चिंचोळी (मै), सांगवी बु, हन्नूर, वागदरी तर सकाळी ११ वाजता – उमरगे, कुरनूर, मुगळी असे सहा टप्प्यात करण्यात आले आहेत. सर्वच निकाल अधिकृत पणे बाहेर येण्यास दुपारी १ ची वेळ होईल,असेही प्रशासनाने सांगितले आहे.ज्या वेळेला ज्या गावची मतमोजणी आहे त्यावेळीच मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना सोडले जाणार आहे.म्हणून विनाकारण कोणीही तहसील आवारात गर्दी करु नये,असे आवाहन तहसील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!