औरंगाबाद, दि.२७ : रविवारी मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.यामध्ये अनेक धरणे भरली असून त्या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नांदेड जवळच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी तलावाचे दरवाजा आज उघडण्यात आले आहेत. त्यामधून दोन हजार घनमीटर प्रतिसेकंद पाणी खाली सोडण्यात येत आहे.त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री पुन्हा अतिवृष्टी झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये याठिकाणी 267 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातही पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड आणि ममदापूर या परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील माजलगाव ढालेगाव,टाकरवन यासह इतर अनेक प्रकल्प भरले असून याठिकाणी पावसाची रिपरिप अद्यापही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.