---Advertisement---

मराठा आरक्षणासाठी पुण्यात विविध ठिकाणी आंदोलने

Follow Us:
---Advertisement---

 

पुणे,दि.२७ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात विविध पक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यात मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीने उठवावी,अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली तसेच सारथी संस्थेची मुस्कटदाबी बंद करा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करा,अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी भाजपाच्या कार्यालयासमोर देखील निदर्शने करण्यात आली. दरम्यान काल उस्मानाबाद येथेही मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.त्यामध्ये 9 ऑक्टोबरला तुळजापूर येथे होणाऱ्या मराठा आरक्षण ठोक मोर्चाला जाहीर पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!