---Advertisement---

माझा राग पक्षावर नाही, तर एका व्यक्तीवर,भाजप नेते एकनाथ खडसे यांचा पुनरुच्चार

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, दि.२२ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडू नये, यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले,असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.खडसे यांनी भाजपमधील एका बड्या नेत्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर यावर प्रतिक्रिया दिली आहे.याबाबत आपण काहीही बोलणार नाही असे त्यांनी नमूद केले.दरम्यान
याबाबत एकनाथ खडसे यांना माध्यमाने विचारले असता ते म्हणाले की,गेल्या चाळीस वर्षात आपल्या राजकीय कारकिर्दीत भाजपा घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले. पक्षाने आपल्याला खूप सहकार्य
केले,पदे दिली मात्र काही नेत्यांमुळे आपल्यावर ही वेळ आली आहे. पक्षावर अजिबात नाराज नाही, माझी नाराजी एका व्यक्तीवर आहे,असे त्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!