ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माझ्या जन्मगावी सोलापुरी आल्याचा मला खूप आनंद- मारुती चितमपल्ली,म सा प जुळे सोलापूर व हि.ने वाचनालयातर्फे चित्तमपल्ली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सोलापूर,दि.१२ : माझं उर्वरित आयुष्य माझ्या कुटुंबीयांसमवेत घालवावा याचे पोटी माझ्या सोलापूर या मूळगावी मी आलो आहे याचा मला खूप आनंद झाला आहे मला अनेक गोष्टीवर लेखन करायचे आहे आणि त्याचा फायदा मला सोलापुरात होईल, असे मत सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी मारुती चित्तमपल्ली सोलापुरात आल्यानंतर आज सोमवारी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी ते बोलत होते.ऋषी प्रमाणे दाढी वाढलेली अंगात शर्ट व कमरेला लुंगी गुंडाळलेली चेहरा थकलेला तोंडावर फेसशिल्ड घातलेला होता परंतु लिहिण्याची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.जन्मगावी आल्याचा मला खूप आनंद वाटतो मी खूपच थकलेलो आहे. यापुढे शक्यतो घरात बसून माझे राहून गेलेले लिहिण्याचे काम पूर्ण करणार आहे.यापुढे फारसे घराबाहेर पडणार नाही असे सांगून साहित्य संमेलनाच्या वेळी मी वाचनालयात आलो होतो याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. लेखनासाठी आवश्यक असणारी पुस्तकं हिराचंद नेमचंद वाचनालया तर्फे आपणास उपलब्ध करुन देऊ असे वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी यावेळी चितमपल्ली यांना सांगितले.
नागपुरातले माझे सर्व वास्तव्य सोडून मी आता माझ्या जन्मगावी सोलापूरला आलो आहे याठिकाणी माझ्या सर्व नातेवाईकांना मित्रांना भेटणार आहे माझ्या उर्वरित आयुष्यात सोलापुरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देऊन त्यावर माझं लेखन राहील माझ्या उतरत्या वयात मी सोलापूरला जन्मगावी आल्याचा खूप आनंद झाला आहे असे म सा प जुळे सोलापूर चे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्याशी बोलताना मारुती चितमपल्ली म्हणाले सोलापूरच्या साहित्यिक वातावरणात मला सहभागी व्हायला आवडेल परंतु माझी तब्येत किती साथ देते त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला कोणत्याही क्षणी सोलापूरच्या साहित्यिकांचे योगदान मिळेल साहित्य परिषद आपल्याला सहकार्य करेल असे पद्माकर कुलकर्णी यांनी यावेळी त्यांना आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!