मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यावरून आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. भारत बंदच्या या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी घणाघाती टीका केली आहे. “डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?
माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
“मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. “माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.