---Advertisement---

…म्हणून संजय राऊतांनी घेतली सहकुटुंब शरद पवारांची भेट

On: January 15, 2021 5:59 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राऊत यांच्यासह पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. राऊतांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे होते. परंतु, ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचे समोर आले आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा लवकरच मल्हार नार्वेकर यांच्याशी विवाह होणार आहे. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र आहेत. ३१ जानेवारी रोजी पूर्वशी आणि मल्हार यांचा मुंबईत साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत यांनी सहकुटुंब शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते.

दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. राज्यात काही झालं तरी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जाते. मग दिल्लीत जे कृषी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू, अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!