---Advertisement---

….म्हणून संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

On: December 2, 2020 1:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (बुधवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लीलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू हे संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करणार आहे. संजय राऊत यांच्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.  संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधीत उपचार सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!