---Advertisement---

यंदा पदवीधर मतदार इतिहास घडवणार : गायकवाड ; सोलापूर येथे प्रा.कोकाटे यांच्या प्रचारार्थ मेळावा

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.२२ : खऱ्या अर्थाने पदवीधरांच्या समस्येसाठी विधानपरिषदेत आवाज उठवणाऱ्या प्रा.श्रीमंत कोकाटे यांच्या पाठीशी पदवीधरांनी उभे राहावे,असे आवाहन प्रवीण गायकवाड यांनी केले.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ.
श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या प्रचारादरम्यान फडकुले सभागृहात झालेल्या पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. स्वाभिमानी व सुज्ञ पदवीधर डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या पाठीशी आहे. विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांचे पुनर्वसन व कारखानदारांचे पुनर्वसन करण्याची ही निवडणूक नाही तर खऱ्या अर्थाने पदवीधरांच्या समस्येसाठी विधानपरिषदेत आवाज उठवणाऱ्या निवडणुकीस उभारलेल्या ६२ उमेदवारांपैकी सर्वोत्तम उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना पसंती क्रमांक एकचे मत देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी युवा उद्योजक गणेश माने देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी पदवीधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास अमरजित पाटील, डी. एन. गायकवाड, डॉ. रावसाहेब पाटील, इरफान सय्यद, बसवराज बगले यांच्यासह मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!