ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रत्नागिरी, अलिबाग जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होत आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक असणार आहे.  जिल्ह्य़ातील ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबर पासून शाळा होत आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात येत आहे. दरम्यान आज रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ ते १२ वीच्या शाळा सुरु होत असून यावेळी फक्त २ हजार २८१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिली आहेत. पालकांची संमती मिळेल तशा शाळा सुरु कराव्यात, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी शिक्षकांना करोना चाचणी बंधनकारक आहे. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी ३, तर खेड तालुक्यातील १ शिक्षक करोनाबाधित आढळले आहेत.

रायगडमध्ये ५४५ शाळा सुरु

अलिबाग : रायगड जिल्ह्य़ात पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता  नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुमारे ५४५ शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!