दिल्ली,दि.२२ : खरीप हंगाम 2020 – 21 साठी अनेक राज्यांकडून केंद्र सरकारने या हंगामातील धान्याची खरेदी सुरू केली आहे.यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणा राज्यातून प्रामुख्याने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.
या तिन्ही राज्यातून आतापर्यंत पाच कोटी 48 लाख रुपयांच्या किमान आधारभूत किमतीत मूग आणि उडीदाचे खरेदी करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ही प्रक्रिया केंद्राकडून वेगाने सुरू आहे.आतापर्यंत सात लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून नव्वद लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त धान्याची खरेदी करण्यात आल्याचे केंद्र सरकारने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.