---Advertisement---

राज्याच्या परवानगीशिवाय आता सीबीआय चौकशी नाही,गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२२ : महाराष्ट्रासाठी आणखीन एक मोठी बातमी आहे.ती म्हणजे आता सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकरणाची चौकशी राज्यात करता येणार नाही,असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. याची अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. सीबीआय अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करणारी संस्था आहे पण त्याचा वापर हा राजकीय फायदा मिळविण्यासाठी होत असल्याची शंका आहे,त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. राजकीय दबावापोटी अनेक केसेस सीबीआयला दिले गेले आहेत.त्यामुळे यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या परवानगीशिवाय हस्तक्षेप करता येणार नाही,असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!